
इगतपुरीनामा न्यूज – २८ एप्रिलला घोटी बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक होत असून ह्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या १८ उमेदवारांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करील असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे यांनी केले आहे. कावजी ठाकरे यांचे इगतपुरी तालुक्यातील विविध भागात प्राबल्य असून त्यांनी शेतकरी विकास पॅनलला पाठिंबा घोषित केला आहे. लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलमध्ये सोसायटी गटातून निवृत्ती भिकाजी जाधव, सुनील रामचंद्र जाधव, शिवाजी लक्ष्मण शिरसाठ, हरिदास नरहरी लोहकरे, अर्जुन सयाजी पोरजे, रमेश सदाशिव जाधव, भाऊसाहेब पांडुरंग कडभाने. महिला राखीव – सुनीता संदीप गुळवे, आशा भाऊसाहेब खातळे. ओबीसी – राजाराम बाबुराव धोंगडे. व्हीजेएनटी – ज्ञानेश्वर निवृत्ती लहाने. ग्रामपंचायत गट सर्वसाधारण – अर्जुन निवृत्ती भोर, नंदलाल भाऊ भागडे. एससीएसटी – संतू नारायण साबळे. आर्थिक दुर्बल – संपत किसन वाजे. व्यापारी गट भरत सखाराम आरोटे, नंदलाल चंपालाल पिचा. हमाल तोलारी गट रमेश खंडू जाधव हे १८ उमेदवार विजयी होतील असा विश्वास कावजी ठाकरे यांनी व्यक्त केला. कपबशी निशाणीवर ठसा मारून बाजार समितीची सत्ता पॅनलच्या ताब्यात येणार असल्याचे ते म्हणाले.