
इगतपुरीनामा न्यूज – शेतकरी विकास पॅनलच्या सर्व १८ उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने आपला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे इगतपुरी तालुकाध्यक्ष विक्रम जगताप, महासचिव मिलिंद शिंदे, पक्षनिरीक्षक जितेश शार्दूल, गोंदे दुमालाचे सरपंच शरद सोनवणे, डॉ. आर. वाय. गाडे, नंदुभाऊ पगारे, भूषण पंडित, मिलिंद जगताप, मधुकर बागुल आदींच्या बैठकीत स्व. लोकनेते गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या सोबत सक्रिय उभे राहून पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. सोसायटी गटातून निवृत्ती भिकाजी जाधव, सुनील रामचंद्र जाधव, शिवाजी लक्ष्मण शिरसाठ, हरिदास नरहरी लोहकरे, अर्जुन सयाजी पोरजे, रमेश सदाशिव जाधव, भाऊसाहेब पांडुरंग कडभाने. महिला राखीव – सुनीता संदीप गुळवे, आशा भाऊसाहेब खातळे. ओबीसी – राजाराम बाबुराव धोंगडे. व्हीजेएनटी – ज्ञानेश्वर निवृत्ती लहाने. ग्रामपंचायत गट सर्वसाधारण – अर्जुन निवृत्ती भोर, नंदलाल भाऊ भागडे. एससीएसटी – संतू नारायण साबळे. आर्थिक दुर्बल – संपत किसन वाजे. व्यापारी गट भरत सखाराम आरोटे, नंदलाल चंपालाल पिचा. हमाल तोलारी गट रमेश खंडू जाधव ह्या १८ उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे. पाठिंबा दिल्याचे पत्र शेतकरी विकास पॅनल नेत्यांकडे सुपूर्द करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने ह्या पॅनलचा विजय निश्चित मानला जात आहे.

