इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
नाशिक येथे नव्याने स्थापन झालेल्या `सेफ विंग्स’ ह्या एनजीओ’ चा शिक्षणापासून वंचित, शोषित समाजातील व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात आर्थिक, शैक्षणिक मदत करणे हा मानस आहे. या पद्धतीनेच यावर्षी राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक विद्यार्थांना शिक्षण घेताना अडचणी येत आहेत. ह्या भयाण परिस्थितीचा विचार करून रायगड जिल्ह्यातील पोलादपूरच्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना `सेफ विंग्स’ तर्फे विविध शैक्षणिक साहित्य पाठवण्यात आले. तेथील शौर्य अकॅडमी व दोन जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप होणार आहे. पोलादपूर जि.रायगड येथील शौर्य अकॅडमी आणि तेथील स्थानिक प्रशासनाच्या मदतीने परिसरातील काही जिल्हा परिषदेच्या शाळांशी संपर्क करून त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या संस्थेने मागील काही दिवसांपूर्वी `सोशल मीडियाच्या’ माध्यमातून संस्थेच्या सदस्यांच्या ओळखीच्या व्यक्ती, नातेवाईक व मित्र परिवारांना मदतीसाठी आवाहन केले. विशेष मोहीम राबवून काही रक्कम जमा केली. ती सर्व रक्कम एकत्र करून त्याचे शैक्षणिक साहित्य खरेदी केले. ते साहित्य पूरग्रस्त विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले.`सेफ विंग्स’ संस्थेचे महेंद्र साळवे, धम्मानंद साळवे, सुशील खरे, सोनल काळे, मिनल शिरसाठ, करूनाशील पगारे, पूर्वा परदेशी, अजिंक्य गांगुर्डे, स्नेहल दिवे, निकिता काळे, ऐश्वर्या कोळे, जगदीश आल्हाट, संतोष वानखेडे आदी सदस्यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.