शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या घोटी बाजार समितीवर शेतकरी विकास पॅनलच्या १८ उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या : खरेदी विक्री संघाचे माजी व्हॉइस चेअरमन हरिश्चंद्र नाठे यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – बळीराजाचे जिव्हाळ्याचे प्रश्न, समस्या, अवकाळी पावसाच्या संकट आणि सुखदुःखात सहभागी कायमच सोबत राहणारे १८ उमेदवार घोटी बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलतर्फे उमेदवारी करीत आहेत. लोकनेते स्व. गोपाळरावजी गुळवे यांच्या प्रगल्भ विचारांचा वारसा ह्या सर्व उमेदवारांना लाभला आहे. काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, कचरू पाटील डुकरे आदी सक्षम नेते पॅनलचे नेतृत्व करीत आहेत. म्हणून शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे. त्यासाठी मतदारांनी कपबशी ह्या निशाणीवर ठसा मारून सर्व उमेदवारांना विजयी करण्यात योगदान द्यावे असे आवाहन इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघाचे माजी व्हॉइस चेअरमन हरिश्चंद्र बाबुराव नाठे यांनी केले आहे. घोटी बाजार समिती ही संस्था इगतपुरी तालुक्यातील सामान्य शेतकरी कुटुंबासाठी अतिशय जिव्हाळ्याची आहे. ह्या संस्थेच्या माध्यमातून चांगले काम उभे करता येऊ शकते. यासाठी शेतकरी विकास पॅनल हा स्व. दादासाहेब गुळवे यांच्या विचारांच्या भक्कम पायावर उभा आहे. स्व. दादांना श्रद्धांजली म्हणून शेतकरी हिताचे १८ उमेदवार बाजार समितीवर बहुमताने पाठवण्याचे आवाहन हरिश्चंद्र नाठे यांनी केले आहे.

error: Content is protected !!