इगतपुरी मतदारसंघात ‘ह्या’ २६ जणांनी केले ३९ उमेदवारी अर्ज दाखल ; उद्या होणार छाननी

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी इगतपुरी अनुसूचित जमाती राखीव मतदारसंघातून आज अखेरच्या दिवसापर्यंत २६ जणांनी ३९ उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि अपक्ष म्हणून विद्यमान आमदार हिरामण भिका खोसकर, इंदिरा काँग्रेसतर्फे लकीभाऊ भिका जाधव, इंदिरा काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि २ अपक्ष म्हणून माजी आमदार निर्मला रमेश गावित, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अपक्ष म्हणून माजी आमदार काशिनाथ दगडू मेंगाळ, इंदिरा काँग्रेस व अपक्ष म्हणून अनिता रामदास घारे, शिवसेना उबाठा आणि अपक्ष म्हणून कावजी गंगाराम ठाकरे, इंदिरा काँग्रेसतर्फे ४ अर्ज उषा हिरामण बेंडकोळी, महाराष्ट्र स्वराज्य पार्टीतर्फे शरद मंगलदास तळपाडे, वंचित बहुजन आघाडीतर्फे भाऊराव काशिनाथ डगळे, बहुजन समाज पार्टीतर्फे धनाजी अशोक टोपले, जनसंवादी पार्टी आणि आम हिंदुस्थानी पार्टीतर्फे अनिल दत्तात्रय गभाले, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे बिबाबाई हरिश्चंद्र भले, पिसन्टस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया आणि अपक्ष म्हणून अशोक वाळू गुंबाडे, भारत आदिवासी पक्षातर्फे कांतीलाल किसन जाधव, अपक्ष म्हणून जयप्रकाश शिवराम झोले, रवींद्र तुकाराम भोये, वामन हिरामण खोसकर, गोपाळ दगडू लहांगे, भगवान रामभाऊ मधे, नरेश यशवंत घारे, शंकर दशरथ जाधव, संदीप रघुनाथ जाधव, कैलास सदू भांगरे, विकास मोहन शेंगाळ, किशोर अंबादास डगळे, जीवनकुमार परशराम भोये अशी उमेदवारांची नावे आहेत. उद्या छाननी प्रक्रिया होणार आहे. राजकीय पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करतांना त्या पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नसल्यास किंवा अन्य काही त्रुटी आल्यास अर्ज अवैध ठरतो. त्याप्रमाणे ते उमेदवारी अर्ज बाद होतील. वैध ठरलेल्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी मुदत देण्यात आलेली असून त्या प्रकियेनंतर रिंगणात असलेल्या उमेदवारांची संभाव्य लढत स्पष्ट होईल.

Similar Posts

error: Content is protected !!