कवितांचा मळा – विराह

कवी – देव जाधव, आंबेवाडी

वेड मला लावून तू
वेड मला केलंस
जन्मंतरीच्या प्रवासात तू
सोडून मला दिलंस…

दुःख वेदना सोसत मी
तुझीच वाट पाहिली
माझी माझी म्हणता म्हणता
तू माझीच न राहिली…

आठवण तुझी येते तेव्हा
माझ्या नयनी येते पाणी
दाखवलेल्या स्वप्नांची
अपुरीच राहिली कहानी

विसरायचं म्हटलं तरी तुला
तू अविस्मरणीय होतेस
आठवायचं नाही म्हटलं तरी
आठवण तुझी येतेच…

Similar Posts

error: Content is protected !!