“आत्मा” नियामक मंडळ समितीच्या सदस्यपदी बलायदुरीचे शेतकरी भगीरथ भगत यांची निवड : जिल्हाधिकाऱ्यांसह कृषी अधिकाऱ्यांकडून नव्या सदस्यांचा सत्कार

इगतपुरीनामा न्यूज, दि. 11

इगतपुरी तालुक्यातील बलायदुरीचे प्रयोगशील शेतकरी भगीरथ दत्तू भगत यांची आत्मा संस्थेच्या आत्मा नियामक मंडळ समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांच्या विस्तारविषयक सुधारणाकरिता सहाय्य ( आत्मा ) अंतर्गत नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच  बैठक झाली. यात येथील शेतकरी भागीरथ भगत यांची नियामक मंडळ समितीवर अशासकीय सदस्य म्हणून दोन वर्षांसाठी सार्थ निवड झाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मेहनतीच्या बळावर आपल्या शेतीत विविध प्रकारच्या आधुनिक तंत्राचा अवलंब करून भगीरथ भगत नेहमीच वेगवेगळे प्रयोग करीत असतात. त्याबरोबरच वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे बहुमोल काम करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. शासनाच्या महत्वपूर्ण योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहीत होण्यासाठी ते प्रयत्न करतात. त्यांच्या कामाची दखल घेऊन अनेक संस्थानी आदर्श शेतकरी म्हणूनही त्यांचा गौरव केला आहे.

कृषी तंत्रज्ञान व्यवसथापन यंत्रणा यांच्या समितीमध्ये त्यांची सार्थ निवड झाल्याने त्यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी वेळोवेळी मार्गर्शन करून बळीराजाच्या हितासाठी काम करणार असल्याचे भगीरथ भगत यांनी सांगितले. ह्या समितीमध्ये रवींद्र धनसिंग पवार, देविदास मार्कंड, योगेश गोसावी, कृष्णा भामरे, विमल आचारी, भागवत बलक, शामराव गावंडे, मनीषा पोटे, विजय नाना पाटील यांनाही सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी डी. गंगाथरन आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भगीरथ भगत आणि नवीन सदस्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी नाशिकचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, नाशिकचे प्रकल्प संचालक आत्मा राजेंद्र निकम, प्रकल्प उपसंचालक वंदना शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी मोहन वाघ, तालूका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर, मंडळ कृषी अधिकारी मनोज रोंगटे, कृषी सहाय्यक दिपक भालेराव, हितेंद्र मोरे उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!