नवी पिढी आणि सक्षम भारताचे निर्माण करण्यात शिक्षकांचे अमूल्य योगदान – भास्कर सोनवणे : पिंप्री सदो शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी शाळा विविध ज्ञानाचा खजिना आहे. ह्यातूनच उच्च ध्येय जागृत होऊन हे उद्धीष्ट पूर्ण व्हायला मदत होते. विद्यार्थ्यांच्या बालमनावर सुसंस्कार, संस्कृतीची पेरणी करून शिक्षकांद्वारे नव्या पिढीचे आणि सक्षम भारत देशाचे निर्माण केले जात आहे. शाळेतील प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण विविध ज्ञान देणारा आहे. शाळेला निरोप दिला असला तरी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला कधीच निरोप दिला जात नाही. ह्या विद्यार्थ्यांकडून आगामी काळात विविध क्षेत्रात प्रगती केल्याचे पाहून सर्वाधिक आनंद शिक्षकांना होतो. म्हणून निरोप समारंभ हा शिक्षकांचे आपल्यावरील ऋण व्यक्त करण्याचाही दिवस आहे असे प्रतिपादन इगतपुरीनामाचे संपादक भास्कर सोनवणे यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो जिल्हा परिषद शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानावरून भास्कर सोनवणे बोलत होते. पिंप्री सदो शाळेतील शिक्षक निवृत्ती नाठे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत सर्वोत्तम प्रकारे व्यक्तिमत्व विकास आणि जागरूक विद्यार्थ्यांची फौज निर्माण केली असल्याचे कौतुक त्यांनी केले. भास्कर सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र सांगितला

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदास वाकचौरे माजी अध्यक्ष अमजद पटेल, उपाध्यक्ष दिपाली जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बबलू उबाळे, खादी ग्रामोद्योगचे संचालक भगीरथ भगत, मुख्याध्यापिका शोभा ढोले, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष निवृत्ती नाठे, मेजर विनोद पाटील, शिक्षक विलास उबाळे, चेतना गावित आणि पालक उपस्थित होते. यावेळी सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणी सांगत सर्व शिक्षकांचे आमच्यावर अनंत उपकार असल्याची भावना व्यक्त केली. अनेक वर्षांपासून प्रत्येक विद्यार्थ्याला सक्षम करण्यासाठी विविधांगी ज्ञानदान केले. पुस्तकांचे वाचन, आर्थिक बचत, आरोग्य, सुसंस्कृत समाज निर्माण आदी विषयांवर शिक्षक निवृत्ती नाठे यांनी मार्गदर्शन केले. माजी अध्यक्ष अमजद पटेल, शिक्षक विलास उबाळे, चेतना गावित, शोभा ढोले यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सर्व निरोपार्थी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक निवृत्ती नाठे यांच्या तर्फे पाहुण्याच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आठवण म्हणून वर्गशिक्षक निवृत्ती नाठे यांना शिवरायांची मूर्ती, शाळेसाठी सरस्वतीची मूर्ती, मुख्याध्यापिका शोभा ढोले यांना मनगटी घड्याळ भेट दिले. वर्गशिक्षक निवृत्ती नाठे यांच्याकडून विद्यार्थ्यांना मिसळ पार्टी देण्यात आली. नृत्याचा मनमुराद आनंद घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक विनोद पाटील यांनी अनमोल सहकार्य केले.

स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स

इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा

संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps

Similar Posts

error: Content is protected !!