इगतपुरीजवळ डस्टर वाहनाला अचानक आग लागल्याने वाहन भस्मसात

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावर तळेगाव जवळ ५ वाजता डस्टर कारने अचानक पेट घेतल्याने वाहन खाक झाले आहे. सुदैवाने चालकासह दोन प्रवासी बचावले आहेत. डस्टर कार एमएच ४८ पी ५४३९ ह्या गाडीच्या क्लचमध्ये बिघाड होऊन ब्रेक फेल झाला. गाडीतून धूर निघू लागल्याने चालक विलास विठ्ठल पितळे रा. सामनगाव याने प्रसंगावधान राखत गाडी सर्व्हिस रोड वर घेतली. हॅन्डब्रेकच्या सहाय्याने गाडीवर नियंत्रण मिळवत गाडी उभी केली. तोपर्यंत चालकासह दोन प्रवाशी वाहनातुन खाली उतरून प्रसंगावधान राखत बाहेर पडले. काही वेळात संपूर्ण गाडीने डोळ्यादेखत पेट घेत संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. महामार्ग पोलीस केंद्र घोटी यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचुन महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीची अग्निशमन दलाला पाचारण करीत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आग आटोक्यात येत नव्हती तोपर्यंत इगतपुरी नगर परिषद व महामार्ग सुरक्षा पथकाची अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्याने एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. अधिक तपास महामार्ग पोलीस पथक करीत असून महामार्ग सुरक्षा पोलीस पथक, पोलीस उपनिरीक्षक सोपान राखोंडे, महिंद्रा कंपनीचे वरीष्ठ अधिकारी, फायर ऑफिसर, फायरमन अजय म्हसणे, गणपत आवघडे, मनोज भडांगे, विशाल सकट, एम. बी. खेताडे, एम. एन. भटाटे, नगर परिषदचे फायर मॅन व चालक नागेश जाधव, फिरोज पवार, सुभाष बागडे, जमिर पटेल, अजय तुपे, गोलु भारूळे, राज जावरे यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

Similar Posts

error: Content is protected !!