इगतपुरीनामा न्यूज – लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलतर्फे नाशिक जिल्ह्यात महत्वपूर्ण असणाऱ्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संपूर्ण १८ जागा विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. स्व. गोपाळराव गुळवे यांच्या स्वप्नातील शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी पॅनलचे सर्व उमेदवार बांधील आहेत. बाजार समितीच्या मतदारांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी हे पॅनल वचनबद्ध असून सर्वांनी एकजुटीने बाजार समितीवर पॅनलचा झेंडा झळकण्यासाठी कामाला लागावे. यासह विजयाचा जल्लोष करण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे असे प्रतिपादन आज कावनई येथे लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या विविध पदाधिकाऱ्यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील सर्व सोसायटीचे चेअरमन, व्हॉइस चेअरमन, संचालक, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी, हमाल, मापारी आणि समर्थकांच्या मेळाव्यात विविध पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कामाक्षी माता मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. ह्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, भारतीय जनता पक्ष आदींची युती झाली असून संपूर्ण १८ जागा युती झाल्याने ह्या पॅनलच्या पारड्यात आजच आल्या असल्याचा आनंद ह्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार आणि समर्थक मोठ्या संख्येने हजर होते. काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य गोरख बोडके, खरेदी विकी संघाचे माजी चेअरमन ज्ञानेश्वर लहाने, माजी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, सुनील वाजे, खंडेराव शिवराम झनकर, शिवसेना शिंदे गटाचे नेते देविदास जाधव, शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख भगवान आडोळे, माजी तालुकाप्रमुख राजाराम नाठे, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव, सुनील जाधव, रतन पाटील जाधव, कचरू पाटील डुकरे, समाधान वारुंगसे, मविप्रचे माजी संचालक भाऊसाहेब खातळे, भाजपा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने, स्वराज्यचे तालुकाध्यक्ष नारायण भोसले, राजाराम धोंगडे, कचरू पाटील शिंदे, ॲड. दिनकर खातळे, जयराम धांडे, अरुण गायकर, कारभारी नाठे, माजी सभापती सोमनाथ जोशी पांडुरंग खातळे, रामदास गव्हाणे, सुदाम भोर, प्रभाकर गोवर्धने, पप्पू हांडे, तुकाराम सहाणे, दिनकर सहाणे, संजय आरोटे, बाळा गव्हाणे, विनोद आवारी, नंदू गुळवे, नंदलाल भागडे, व्यंकटेश भागडे, संतोष गुळवे, रमेश निसरड आदी उपस्थित होते.
स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स
इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा
संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps