
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वाकी ग्रामपंचायत हद्दीतील बिटूर्ली येथील भाऊ बुधा पारधी यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली. ह्या आगीत संपूर्ण घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. महिन्याभरावर त्यांच्या मुलीचे लग्न असल्याने खरेदी केलेल्या लग्न साहित्यासहित पूर्ण सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. सुदैवाने वेळीच सावध झाल्याने घरातील सर्व lजण बाहेर पडल्याने जीवित हानी झाली नाही. आग विझविण्यासाठी गावातील नागरिकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. मात्र सर्वांच्या हाती अपयश आले. घोटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू केला आहे.