इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बिटूर्ली येथील भाऊ बुधा पारधी यांच्या राहत्या घराला मंगळवारी अचानक आग लागली. ह्या आगीत त्यांचे संपूर्ण घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. महिन्याभरावर त्यांच्या मुलीचे लग्न असल्याने खरेदी केलेल्या लग्न साहित्यासहित पूर्ण सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा रोटरी क्लबचे अध्यक्ष गोरख बोडके यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. एका कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तातडीने नवीन घराचे बांधकाम सुरु करीत असल्याचे त्यांनी भाऊ बुधा पारधी यांना सांगितले. यावेळी त्यांना अन्नधान्य, संसारोपयोगी, भांडी आदी साहित्य दिले. बाधित कुटुंबाने गोरख बोडके यांचे डोळ्यात अश्रूधारा आणून आभार व्यक्त केले. यावेळी माजी सभापती विष्णू चव्हाण, उपसरपंच शिवनाथ काळे, माजी सरपंच पांडुरंग खातळे, सरपंच विनायक गतिर, हरीश चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. तुमच्या परिवाराच्या सोबत राहून आवश्यक ती सर्व मदत करील असे आश्वासन गोरख बोडके यांनी यावेळी दिले.
स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स
इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा
संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps