
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील बांबळेवाडी टाकेद बुद्रुक येथील श्रद्धा उत्तम भवारी- चिखले हिची कृषी उपसंचालक वर्ग १ ह्या पदावर निवड झाली आहे. महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२१ च्या मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ तासाभरातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली. यामध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून श्रद्धा भवारी-चिखले हिने प्रथम क्रमांक पटकावला. राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुशिलकुमार चिखले यांच्या त्या सौभाग्यवती आहेत. बांबळेवाडी येथील शिक्षक उत्तम भवारी व सुमन भवारी यांची ती कन्या असून तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
श्रद्धाचे पदवीचे शिक्षण हे नाशिकच्या के. के. वाघ कृषी महाविद्यालयात झाले असून पदव्युत्तर शिक्षण उत्तराखंड राज्यातील गोविंद बल्लभ पंत विद्यापीठात झालेले आहे. सासू सासरे निवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब चिखले व आशा चिखले, श्रद्धाचे पती महाराष्ट्र आदिवासी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष सुशिलकुमार चिखले यांनी तिच्या यशाबद्दल अत्यानंद व्यक्त केला आहे. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, सत्यजित तांबे, ॲड. माणिकराव कोकाटे, डॉ. किरण लहामटे, हिरामण खोसकर, भास्कर गुंजाळ, सिनेट सदस्य प्रा. डॉ. नितीन तळपाडे, सीमंतिनी कोकाटे, हरिदास लोहकरे, सोमनाथ जोशी, डॉ. श्रीराम लहामटे आदी पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.
स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स
इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा
संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps