इगतपुरीनामा वेब पोर्टलचा महिला पोलिसांच्या हस्ते श्रीगणेशा; आदिवासी महिलांकडूनही शुभारंभात सहभाग

इगतपुरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी प्रमिला पवार यांच्या हस्ते पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला.

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ :
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नागरीकांसाठी हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या इगतपुरीनामा वेब पोर्टलचा श्रीगणेशा आज करण्यात आला. जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी प्रमिला पवार यांच्या हस्ते संगणकावर पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. रस्ता नसलेल्या धामडकीवाडी ह्या आदिवासी गावातील आदिवासी महिला भगिनींनी सुद्धा मोबाईल फोनवर टिचकी मारून पोर्टलच्या शुभारंभात सहभाग नोंदवला. आजपासून इगतपुरीनामा हे वेब पोर्टल दोन्ही तालुक्याच्या सेवेत रुजू झाले आहे.