मुकणे येथे शिवचरित्र कथा आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याने शिवजन्मोत्सवाची सांगता : युवकांकडून दरमहा १९ तारखेला कपिलधारा तीर्थाने होणार महाराजांचा अभिषेक

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

सिहांसनाधीश्वर…योगीराज… श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ! अशा अनेकानेक घोषणा देत मुकणे येथे शिवजयंतीनिमित्त तीन दिवस अभूतपूर्व उत्साह संचारला होता. एव्हढेच नव्हे तर दर महिन्याच्या १९ तारखेला कपिलधारा तीर्थ आणुन महाराजांचा अभिषेक करण्यात येणार आहे. संपूर्ण गावात महाराजांची आरती करण्याचा संकल्पही करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी डिजेच्या तालावर थिरकत महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होतात. मात्र मुकणे येथील युवकांनी समस्त युवा वर्गाला आदर्शवत अशी शिवजयंती साजरी करुन नवा आदर्श निर्माण केला आहे. केवळ पैसे खर्चूनच नव्हे तर स्वत: सहभागी होऊन तीन दिवस मोठ्या आनंदमय वातावरणात व अभूतपुर्व उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला.

दररोज ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने होणाऱ्या कार्यक्रमांनी अवघे वातावरण शिवमय झाले होते. मुकणे येथील शिवगर्जना मित्र मंडळाच्यावतीने तरूण युवकांनी शिवजन्मोत्सव सोहळा प्रारंभ करताना प्रथम श्रीक्षेत्र कपिलधारा तीर्थ कावनई येथुन कपिलधारा तिर्थ आणले. पहाटे ५ वाजता महाराजांच्या मुर्तीला अभिषेक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला.  कार्यक्रमाला अभुतपूर्व उत्साहात सुरुवात करुन तरुणाईला साजेशी शिव जयंती साजरी करण्यांत आली. गावातुन टाळ मृदुंगाच्या गजरात लहान मुले आणि मुलींनी भगवे वस्त्र परिधान करून नृत्याच्या तालावर शिवरायांची पालखीतुन मिरवणुक काढली. यानिमित्ताने एक वेगळा आदर्श मुकणे येथील युवकांनी घालुन दिला. मनोहर महाराज सायखेडे यांनी तीन दिवसीय शिवचरित्र व्याख्यान व पारायण सोहळ्यातून गावात शिवमय वातावरण तयार केले. महाराजांचा जीवनपट उलगडणारे तीन दिवसीय शिवचरित्र व्याख्यानाने खरी शिवजयंती मुकणे येथे साजरी झाली.

या कार्यक्रमावेळी शिवाजी महाराजांसह अनेक पात्र येथील युवकांनी पात्राला साजेशी वेशभुषा करुन  सादर केले. भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुलांचे भाषण, नृत्य स्पर्धांनी गावातील वातावरण आनंदमय झाले. लहान मुलांनी नृत्य व भाषण सादर केल्यानंतर युवकांनी स्वखर्चाने वही,पेन व शैक्षणिक वस्तु बक्षीस म्हणुन सहभागी मुला मुलींना दिल्या .
शिवगर्जना मित्र मंडळाचे समाधान राव, बापु राव, दिपक राव, मिननाथ गुळवे, गोकुळ राव, त्र्यंबक आवारी, राहुल नाठे, दिलीप जाधव, राहुल राव, दिनेश राव, पप्पु नरवटे, अंकुश खांदवे, सुनिल आवारी, दिपक आवारी, राहुल गोवर्धने, अरुण राव, गणेश बोराडे, दिनेश बोराडे, गणेश शिंदे, सरपंच हिरामण राव, दिलीप राव, अशोक राव, चेतन शिंदे, चेतन वेल्हाळ, रामनाथ राव, निलेश राव, सचिन राव, अमोल आंबेकर, गणेश राव, निवृत्ती राव, समाधान सोमनाथ राव आदींसह मुकणे गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!