पाडळी देशमुखजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

मुंबई आग्रा महामार्गावरील पाडळी देशमुख जवळ महाराष्ट्र माझा हॉटेलसमोर रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिली.  यामध्ये पादचारी गंभीर जखमी झाला असून त्याला नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांच्या समयसुचकतेने जखमी व्यक्तीला तात्काळ उपचार मिळाल्याने त्यांच्यावरचे संकट टळले आहे.

मुंबई आग्रा महामार्गावर पाडळी देशमुख गावाजवळ महाराष्ट्र माझा हॉटेलच्या दिशेने अविनाश रामदेव पंडित वय ३२ रा. बिहार हा रस्ता ओलांडत होता. घोटीकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या ह्या अपघातात हा पादचारी गंभीर जखमी झाला. याबाबत माहिती समजल्याने नरेन्द्राचार्य संस्थान मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी जखमीला तात्काळ उपचारासाठी नाशिकला दाखल केले. पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!