धांडे परिवाराच्या संस्कार, संस्कृती आणि सत्संग जपणाऱ्या कार्यामुळे सर्वांसमोर आदर्श – माजी मंत्री बाळासाहेब थोरात : पाडळी देशमुख येथे विविधांगी कार्यक्रमांनी कृतज्ञता सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ – आई वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे. भक्त पुंडलिकाच्या माता पिता भक्तीला भुलून साक्षात परमात्म्याला सुद्धा पंढरीमध्ये येणे भाग पडले. अशी सेवा करणाऱ्याला अन्य कोणतेही तीर्थाटन करण्याची आवश्यकता नाही. इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील धांडे परिवाराने वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा टिकवून ठेवत सर्वांसमोर प्रेरक आदर्श घालून दिला आहे. ह्या परिवाराचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. इंदिरा काँग्रेसचे माजी इगतपुरी तालुकाध्यक्ष रामदास पाटील धांडे यांनी वडील सखाराम धांडे, आई गंगूबाई सखाराम धांडे यांचे अभिष्टचिंतन तथा कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते. या परिवाराच्या सांप्रदायिक वारकरी परंपरेमुळे संस्कार, संस्कृती, सत्संग यामध्ये मोठी भर पडत आहे. वारकरी सांप्रदायाच्या माध्यमातून धांडे परिवाराची कृतज्ञता व्यक्त करतो असे ते शेवटी म्हणाले. सोहळ्याप्रसंगी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, नाशिक मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील, मविप्रच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार, जगतगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती हभप डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर उपस्थित होते. ह्या सोहळ्यात गुरुवर्य हभप बाळासाहेब महाराज देहूकर, मठाधिपती गुरुवर्य हभप माधव महाराज घुले यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. साहित्याचार्य जगदीश महाराज जोशी, हभप अशोक महाराज धांडे यांनी सोहळ्याचे संयोजन केले. समस्त ग्रामस्थ, तरुण मित्र मंडळाने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कीर्तनकार, भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स

इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा

संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps

Similar Posts

error: Content is protected !!