प्रा. देविदास गिरी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने उद्या इगतपुरीत कृतज्ञता सोहळा : उपस्थित राहण्याचे संयोजकांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने शुकवारी ३१ मार्चला सकाळी ११ वाजता कृतज्ञता सोहळा होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्याप्रसारक समाजाचे संचालक ॲड. संदीप गुळवे हे असणार आहेत. ह्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. भाबड यांनी केले आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मविप्रचे शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. नितीन जाधव, प्राचार्य डॉ. भास्कर ढोके, प्राचार्य डॉ. डी. डी. लोखंडे, प्राचार्य डॉ. विलास देशमुख, मविप्रचे माजी संचालक भाऊसाहेब खातळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड, रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. सीताराम गोसावी, स्थानिक व्यवस्थापन समितीच्या सदस्या वैशाली आडके उपस्थित राहणार आहेत. ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!