कवितांचा मळा – आठवण

कवयित्री – कु. सोनाली कोसे, चंद्रपूर

डोळे मिटता माझे
आठवण तुझीच येई रे
हृदयाच्या गाभाऱ्यात
साठवण फक्त तुझीच रे

पापणीलाही ओलाव्याची
कशी गरज भासते
सांभाळीत स्वतःलाच
वेदना अंतरीच्या जागते

प्रवाह हा जीवनाचा
त्यात मिळाली सोबती तुझी
हसत, बागडत आनंदाने
खुशी हिसकावून घेतली माझी

प्रेम, जिव्हाळा, आपुलकी
केली ना कधी कमी कसली
जीव करूनी अर्पण तुलाच
शेवटी मीच तुझ्या प्रेमात फसली

होईना सहन मजला
हा दुरावा अंतरीचा
साठवून तुला हृदयात
साक्ष आहे माझ्या प्रेमाचा

येईल कधीतरी तुलाही
अचानक माझी आठवण
कळतील मग वेदना माझ्या
आठवण तुझ्या प्रेमाची साठवण

स्पीडनेट इंटरनेट सोल्यूशन्स

इगतपुरी आणि घोटी मध्ये हाय स्पीड इंटरनेट, वायफाय सेवा

संपर्क साधा - 94222 14143
https://maps.google.com/?cid=8651594604110889001&entry=gps

Similar Posts

error: Content is protected !!