कवितांचा मळा : “संस्कार”

कवी : जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१

बाळ जन्मास येता,
देई लाकडी चोखणी !
रडू नको बाळा पण,
खेळ सारी खेळणी !!

आईचे दूध पिण्या,
बाळं रडून थकली !
दुध भूक भागण्या,
देई दुधाची बाटली !!

दोन वर्षा बाळास,
लागे चहाची गोडी !
चहा पिण्या आईचा,
कपच धरुन ओढी !!

झोपेतून उठून रोज,
बाप शिलगे बिडी !
जादूगारा सारखा,
धूर नाकातून काढी !!

पोरगं म्हणे धुराची,
जादू पहावी करुन !
थोटकं पीती पोरं,
आई बापा चोरुन !!

दारु पिऊन बाप,
थकवा कमी करी !
हळूच पोरंगही,
देशी प्याला भरी !!

नशा करी बाप,
गांजा अफू चरस !
जेवणापेक्षा नशा,
वाटत असे सरस !!

बाप म्हणे पोरगं,
असं कसं घडलं !
बापाच्या गुणाने,
पोरगं बिघडलं !!

बाप म्हणे बाळा,
करु नको नशा !
माझ्या सारखी,
तुझी होई दुर्दशा !!

सुसंस्कृत पिढीला,
शिकवू शुभ पाढे !
मुलांना द्या तुम्ही,
संस्कार रुपी धडे !!

( कवी जी. पी. खैरनार हे जिल्हा परिषद अध्यक्ष नाशिक यांचे स्वीय सहाय्यक आहेत. )

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!