गौतम बुद्धांची पंचशील तत्वे मानवी जीवन आणि सकारात्मक आरोग्यासाठी एक देणगी : बुद्ध आणि मानसशास्त्र सहसंबंधाचे मानसशास्त्रीय विवेचन

लेखन – डॉ. कल्पना एस. नागरे, मानसशास्त्रज्ञ

गौतम बुद्ध व आजचे मानसशास्त्र संबंध आहे का याबद्दल खुप लोक प्रश्न विचारत असतात. गौतम बुद्धांनी पंचशील तत्वाचे पालन करण्यास सांगितले होते ते  पंचशील  तत्व म्हणजेच अहिंसा (मी कोणत्याही प्राणीमात्राची हिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, मी कामवासनेपासून दूर राहीन, मी खोटे बोलणार नाही. मी कोणत्याही प्रकारची नशा करणार नाही. हे पाच मंत्र तथागत बुद्धांनी अडीच हजार वर्षाअगोदर जगाला सांगितलेली आहेत. त्याचा उपयोग आज करायचं म्हटलं तरी त्याचे सर्व फायदे आणि फायदेच आहेत. कोणत्याही प्रकारचे नुकसान या पाच नियमाचे अनुकरण केल्याने होत नाही. तथागत बुद्ध हे जगातील पहिले मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी बऱ्याच जणांचे समुपदेशन सुद्धा केल्याचे दाखले त्यांच्या ग्रंथामध्ये उपलब्ध आहेत. जसे की पटाचारा, राजा बिंबिसार, (अहिंसक ), डाकू अंगुलीमाल असे कितीतरी उदाहरणं सांगता येतील. ज्याद्वारे तथागत बुद्ध हे मानसशास्त्रज्ञ होते हे सिद्ध होते. तथागत बुद्धांनी जे पाच नियम सांगितलेले आहेत त्याचे आपल्या शरीरासोबत सुद्धा संबंध आहे. आपलं शरीर सुद्धा पाच फुटाचे बनलेले आहे. आपल्या मेंदूची रचना पाहता आपला मेंदू सुद्धा पाच घटकानुसार किंवा पाच भागांमध्ये विभागला गेलेला आहे. 1. Cerebrum 2. Cerebellum 3. Brain stem 4. Pitituitury gland 5. Hypothalamus या पाच भागापासून मानवी मेंदू तयार झालेला आहे. या पाचही भागाचे विविध प्रकारचे काम आहेत. Cerebrum – आपले जे काही विचार आहेत ते विचार आणि त्या विचाराचं योग्य नियोजन करण्याचं काम ह्याचे आहे. बाहेरून येणारे विचार योग्य आहेत की अयोग्य आहेत ते आपल्यासाठी हानिकारक आहेत की घातक आहेत हे तपासण्याचे काम करते. या घटकांमध्ये आपल्या शरीरातील जेवढे काही घटक आहेत त्या घटकांना नियंत्रित करण्याचे काम योग्य फक्त पुरवठा योग्य ठिकाणी सगळ्या गोष्टी पुरवठा करण्याचे काम हे ब्रेन स्टीम हा करत असतो. मानवी शरीरामध्ये विशिष्ट वयानुसार जे काही बदल होतात ते बदल घडविण्याचे काम ही पियुषिका ग्रंथी ( pituitary gland )करत असते. हायपोथालमस हे शरीरातील विविध संप्रेरक आणि उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावत असते. म्हणजेच आपल्या शरीरात कोणत्या घटकात काय कमी आहे कोणत्या घटकात जास्त घटक आहेत ह्या सगळ्या गोष्टीचे नियोजन हे हायपोथेलामस करीत असतो.

त्यानंतर तथागत बुद्धांनी पृथ्वी, निसर्ग जे काही बनलेला आहे तो पाच घटकांनुसार बनलेला आहे. ते पाच घटक असून त्यात पाणी हा घटक आहे. आपल्या जीवनामध्ये पाण्याला खूप महत्त्व आहे. जवळपास या पृथ्वीवर अन आपल्या शरीरातही 70 टक्के पाणी म्हणजेच रक्त आहे. दुसरा घटक म्हणजे पृथ्वी जडत्व, जडपणा. तो घटक पृथ्वी या घटकाचे प्रतिनिधित्व करीत असतो. नंबर तीनचा घटक आकाश. या घटकामुळे आपले शरीर बनलेले असते. चार नंबरचा घटक हवा. हवेमुळे सुद्धा आपले शरीर बनलेले आहे. ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे त्या त्या ठिकाणी हवा आपल्या शरीरात वास्तव्य करीत असते. पाचवा आणि शेवटचा घटक म्हणजे ऊर्जा किंवा सूर्य या घटकामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा टिकून असते. त्यामुळेच हे पाचही घटक तथागत बुद्धांनी सांगितले की ज्यावेळेस ह्या घटकांमध्ये कमी किंवा जास्त होते. तेव्हा आपल्या शरीरात बऱ्याच व्याधी निर्माण होतात. म्हणून हे घटक जर योग्य प्रमाणात नियंत्रित ठेवले तर मात्र आपले शरीर निरोगी राहण्यास खूप मदत होते. प्राचीन काळामध्ये आपण पाहतो देव किंवा जे महापुरुष होते ते आपणाला विशिष्ट मुद्रेमध्येच बसलेले आहेत. ज्याला आपण ध्यान धारणा असे म्हणतो. असे दिसून येते तर त्या काळात कोणत्याही प्रकारचे दवाखाने, औषधे नव्हते. ते लोक जंगलात राहत होते. तरी पण त्यांना साधी सर्दी, ताप, खोकला, या प्रकारचे कोणतेही रोग झाल्याचे दाखले आपणाला कोणत्याही धर्मग्रंथांमध्ये दिसून येत नाहीत. ते लोक प्रदीर्घ काळ ध्यान धारणा करत असे. ज्याने त्यांचे मन आणि शरीर नेहमी सुदृढ राहत. मानवी मेंदू हा चेतन आणि अचेतन अशा दोन भागात काही मानसशास्त्रज्ञाने विभागलेला आहे. तर चेतन म्हणजे काय बाहेरून ज्या काही गोष्टी येतात ती आपल्यासाठी चांगली आहे की खराब आहे ही गोष्ट बघण्याचं काम हे चेतन मन करीत असते तर अचेतन मन मात्र ज्या काही सूचना येतात, त्या सूचनाची अंमलबजावणी हे अचेतन मन करीत असते. योग्य काय अयोग्य काय यातला फरक समजुन घेण्यासाठी चेतन मन उपयोगी ठरते तर असुखद, त्रासदायक अनुभव विसरण्यासाठी अचेतन मन उपयोगी ठरते. थोडक्यात गौतम बुद्धांनी सांगितलेली पंचशील तत्वे मानवी जीवनासाठी आणि सकारात्मक आरोग्यासाठी एक देणगी म्हणावी लागेल. बुद्ध पर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!

Similar Posts

error: Content is protected !!