
इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ – इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून जनसुविधा योजनेअंतर्गत १० लाखांचे स्मशान भुमी निवाराशेड, स्मशान भुमीघाटचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे ग्रामस्थांनी खासदार हेमंत गोडसे यांचे आभार मानले. निवाराशेडच्या कमतरतेमुळे अंत्यविधीसाठी व इतर धार्मिक कार्यक्रमासाठी नागरिकांना ऊन, वारा, पावसाचा त्रास नेहमीच सहन करावा लागत होता. बसण्यासाठी सुविधा नसल्याने ताटकळत उभे राहावे लागत होते. आता बसण्यासाठी घाट पायऱ्यांची व्यवस्था झाली आहे. ह्या विकासाच्या सुविधा करण्यासाठी ग्रामपंचायतीने खासदार गोडसे यांच्याकडे मागणी केली होती. स्मशान भुमी निवाराशेड नसल्याने खासदार हेमंत गोडसे यांनी जनसुविधा योजनेअंतर्गत निधी उपलब्ध केला.
निवाराशेडचा प्रत्यक्षात काम पूर्ण झाल्याने सरपंच उषा रोकडे, उपसरपंच ललिता रवी काजळे, माजी सरपंच दिलीप मुसळे, माजी उपसरपंच नितीन काजळे, पोपट दिवटे, चंद्रसेन रोकडे, सुखदेव दिवटे, काशिनाथ तांबे, कुंडलिक मुसळे, आनंदा कर्पे, राजू रोकडे, प्रभाकर मुसळे, मनोहर काजळे आदींनी समाधान व्यक्त केले. खा. हेमंत गोडसे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन जनसुविधा योजनेअंतर्गत महत्वाचे काम मार्गी लावले. ते काम पूर्ण झाल्याचे समाधान वाटत असून खासदारांचे आभार मानतो असे माजी उपसरपंच नितीन काजळे यांनी सांगितले.
