
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्चमध्ये घेण्यात आलेल्या शालांत ( इयत्ता १० वी ) परीक्षेचा निकाल परवा म्हणजेच सोमवारी ( दि. २७ ) जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी आज या संदर्भात अधिकृत पत्र काढले असून दहावीचा निकाल कधी लागणार आहे याविषयी समाज माध्यमात आणि एकूणच विद्यार्थ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेला यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. निकालाविषयी इतर तांत्रिक माहिती सविस्तर वाचण्यासाठी बातमीसोबत जोडलेले पत्र पाहावे.