लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज,दि. ५
नाभिक समाज ट्रस्टच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारून अल्पावधित कायापालट करणारे ट्रस्टचे कार्यतत्पर अध्यक्ष एकनाथ कडवे यांचा जन्मदिन अनोख्या पद्धतीने घोटी येथील संत सेना महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून येथील नाभिक समाज मंगल कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. एकनाथ कडवे हे नाभिक समाज ट्रस्टचे अध्यक्ष असुन त्यांनी नाभिक समाजातील अनेक वंचित घटकांसाठी बहुमोल योगदान दिलेले आहे. अगदी कमी काळात त्यांनी ट्रस्टच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारून ट्रस्टचा कायापालट केला आहे, या माध्यमातून समाज मंगल कार्यालय परिसराची नव्याने निर्मिती करून तालुक्यातील गरीब,गरजू लोकांना विविध कार्यक्रमासाठी हॉल, सभामंडप, अद्ययावत किचन, आदीची व्यवस्था केल्याने अगदी अल्प दरात तालुक्यातील नागरिकांना त्याचा फायदा होतोय.
एकनाथ कडवे हे नाभिक समाजातील उदयोन्मुख नेतृत्व असून ते उपक्रमशील युवक आहेत. समाजाच्या तळागाळातील घटकांसाठी त्यांच्याकडून नियमितपणे सातत्याने काम सुरु असते. विविध क्षेत्रातील लोकांशी अखंड संपर्क आणि लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते पायाला भिंगरी लावून काम करतात. येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून मोठे काम उभे राहणार आहे. वाढदिवसानिमित्त त्यांना भरभरून शुभेच्छा देतो.
- काशिनाथ मेंगाळ, माजी आमदार इगतपुरी
त्यांच्या जन्मदिनानिमित्त राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला. याप्रसंगी वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा केला. यावेळी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, घोटीचे सरपंच संजय आरोटे यांनी एकनाथ कडवे यांच्या कामाचे कौतुक करीत त्यांना जन्मदिनाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. नाभिक समाजाचे नेते एकनाथ शिंदे, कायदेशीर सल्लागार ॲड. सुनिल कोरडे, ज्ञानेश्वर कडवे, नारायण शिंदे, आत्माराम कोरडे, किरण कडवे, मच्छिंद्र कोरडे, वाल्मिक रायकर. सुरेश सूर्यवंशी, पत्रकार लक्ष्मण सोनवणे, सोमनाथ कडवे, गोरख कडवे, दिपक कडवे, प्रेमनाथ गायकवाड, संजय बिडवे, नारायण कडवे, निलेश भोर, प्रशांत कडवे, सूर्यकांत कोरडे, भानुदास जाधव आदी समाज बांधव उपस्थित होते.