

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार सेल इगतपुरी तालुकाध्यक्ष पदावर गोंदे दुमाला येथील भाऊसाहेब सखाराम खातळे यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्तीपत्रावर राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी खटकाळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र लहामगे यांच्या सह्या आहेत. पदाच्या माध्यमातून चांगले काम करण्याचा शब्द भाऊसाहेब खातळे यांनी यावेळी दिला. त्यांच्या निवडीचे इगतपुरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.

