

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटी अंतर्गत पोलीस पाटील काँग्रेस संघटन तालुका उपाध्यक्षपदी दशरथ रामकृष्ण धांडे यांची नियुक्ती केल्याचे दुरुस्तीपत्रक इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी काढले आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या आदेशानुसार यापूर्वी तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्तीचे पत्र रद्द करण्यात आले आहे. मुद्रणदोषामुळे तालुका उपाध्यक्ष पदावर निवड झाल्याच्या बातम्या माध्यमामध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. यानंतर तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी दुरुस्ती केलेले नियुक्तीपत्र प्रसिद्ध केले आहे. झालेल्या बदलाची सर्व पदाधिकाऱ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

