मुरंबी येथील १८ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

इगतपुरीनामा न्यूज, दि. ११

इगतपुरी तालुक्यातील मुरंबी येथील १८ वर्षीय युवकाने नैराश्यातून आत्महत्या केली आहे. आज घडलेल्या ह्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास कार्य सुरू केले आहे.

अधिक माहिती अशी की, नामांकित महाविद्यालयात एनसीसी मध्ये निवड न झाल्याने वैभव दत्तू मते वय १८ हा युवक निराश होता. ह्या नैराश्यातून त्याने आज आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. त्याने स्वतःच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ह्या दुःखद घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. वैभव मते ह्याची सैन्य भरतीसाठी जोरदार तयारी सुरू होती. परंतु नैराश्य आल्याने वैभवने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. ह्या घटनेबाबत वाडीवऱ्हे पोलिसांनी नोंद घेतली आहे. पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

आत्महत्येचे आणि निराशाजनक विचार येत असतील तर एकदा आमच्याशी बोलून तर पहा. पण टोकाचे पाऊल उचलू नका

■ भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा 9881258443

■ डॉ. कल्पना नागरे, मानसशास्त्रज्ञ 9011720400

■ किरण फलटणकर, सामाजिक कार्यकर्ते 9225075555

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!