अभियंत्यांचे राज्याच्या जडणघडणीत मोलाचे योगदान – ना. नरहरी झिरवाळ : २०२२ ची दैनंदिनी आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

कोविडच्या संकट काळात राज्यातील अभियंता बांधवांनी उत्कृष्ठ कामे करून राज्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. अभियंत्यांनी उभे केलेले कार्य राज्याच्या लौकिकात भर पडली आहे. मोठ्या परिश्रमांतुन अभियंत्यांनी केलेले सामाजिक कार्य सुद्धा प्रेरणादायी असल्याने सर्वांचे कौतुक करतो असे गौरवोद्गार विधानसभेचे उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांनी काढले. राज्यातील अभियंत्यांनी चांगली व वेळेत कामे करुन राज्याचा नावलौकीक वाढवावा अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. सरळसेवा प्रविष्ट वर्ग-१ अभियांत्रिकी अभियंता अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी २०२२ च्या दैनंदिनी व दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. कोरानाचे नियम पाळुन झालेल्या सोहळ्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ गिते, दैनंदिनी प्रतिनिधी प्रविण पाबळे, प्रमुख मार्गदर्शक डॉ. महेंद्र नाकील, सदस्य राजेंद्र धुम संघटनेमार्फत उपस्थित होते. यावेळी वेळी संघटनेचे इतर पदाधिकारी व संघटनेचे सदस्य राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, मृद व जलसंधारण विभाग व पाणी पुरवठा विभागातीस सहाय्यक अभियंते, कार्यकारी अभियंते, अधीक्षक अभियते यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. संघटना अध्यक्ष हरिभाऊ गीते यांनी दैनंदिनी मधील जाहिरातदारांचे आभार मानले. अखेर दैनंदिनी  प्रतिनिधी प्रविण पाबळे व राजेंद्र भारती यांनी मान्यवर आणि सर्व उपस्थित सदस्यांचे आभार मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!