इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन सानिध्याने पवित्र झालेल्या अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामार्फत श्री स्वामी समर्थ यांच्या चरण पादुका इगतपुरी येथे दाखल झाल्या आहेत. या पादुकांना पालखीत सजवून टाळ मृदुंगांच्या गजरात इगतपुरी शहरातुन पालखी मिरवणूक काढण्यात आली. चरण पादुका भाविकांच्या दर्शनासाठी इगतपुरी येथील जोग महाराज भजनी मठात ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी हजारो श्री स्वामी समर्थ सेवेकरी, भाविक आणि नागरिकांनी अभिषेक, आरती, दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर भजन व भक्तीगीतांच्या कार्यक्रमाद्वारे भाविक मंत्रमुग्ध झाले. भाविक महिलांनी फुगडी व गरबा खेळत पालखीचे जोरदार स्वागत केले. यामुळे इगतपुरी शहरात चैतन्याचे वातावरण पसरले होते. पादुका दर्शनासाठी श्री स्वामी समर्थ भाविकांनी जिल्हाभरातून गर्दी केली आहे.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group