ज्ञानेश्वर महाले : इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नामदेवराव कसबे यांच्या माध्यमातुन एमएसकेएच सिटिंग चाकण येथील कंपनीतर्फे माळेगाव येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यासह शाळेला बॅग, संगणक, क्रीडा साहित्याचे वाटप जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्याम कसबे, बेबी कसबे, सागर नागरे, आनंदा कसबे, नाना कसबे, तानाजी दिवे, वाळु दिवे आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वसामान्य व गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी वणवण करावी लागते. शेकडो विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्याने माळेगाव शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी कै. नामदेव पाटील कसबे नेहमी अग्रेसर होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचे कुटुंबीय कार्यरत आहे. ह्या सामाजिक कार्याचा आलेख असल्याचे जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर यांनी यावेळी सांगितले. आनंदा कसबे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक अनिल भामरे शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.