
इगतपुरीनामा न्यूज, दि. १
दिवाळी म्हटल की चिमुकल्या मुलांना कोण आनंद होतो. अशातच कोणी मान्यवर दिवाळीच्या कार्यक्रमात सहभागी होवून मुलांसोबत दिवाळी साजरी करू लागला तर मग त्यांच्या आनंदाला भरतेच येते. असेच काहीसे आज घडले. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना दिव्यांग शिकत असलेल्या शाळेत दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन बोलावले होते. खा. गोडसे यांनी भाषणात वेळ न घालवता ते थेट अपंग मुलाच्या जथ्यात गेले. त्यांच्याशी थेट गप्पा मारत गोडसे यांनी दिव्यांगांना मिठाई वाटप करत दिवाळी साजरी केली. खासदारांच्या सोबत दिव्यांगांना दिवाळी साजरी करायला मिळाल्याने दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
सातपुर अंबड लिंकरोड येथील सिध्दीविनायक मानसिक अपंग मुलामुलींच्या शाळेत आज खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग मुलांनी पर्यावरण पुरक दीपावली उत्सव साजरा केला. यावेळी नगरसेवक हर्षदा गायकर, संदीप गायकर, मधुकर जाधव, भागवत आरोटे, मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष समीर शेटे, आरटीओ राजेंद्र कराड, बांधकाम व्यावसायिक योगेश जोशी या मान्यवरांसह संस्थेचे ट्रस्टी निलेश धामणे, दिनेश भावरे, निखिल खोत, बाळासाहेब धामणे, गणेश सुर्यवंशी आदींसह पालक उपस्थित होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी मोजक्याच शब्दात मनोगत व्यक्त करत थेट दिव्यांगांमध्ये मिसळत त्यांच्याशी गप्पा मारत त्यांना मिठाईचे वाटप केले. दिव्यांगांना मिठाई भरवत गोडसे यांनी दिव्यांगांचा आनंद द्विगुणीत केला. स्वतः खासदार आपल्यात मिसळत दिवाळी साजरी करत असल्याचा आनंद दिव्यांगांच्या चेहऱ्यावर यावेळी ओसंडून वाहत होता.
