
इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ – इगतपुरी तालुक्यातील दौंडत येथील युवा नेते टायगर ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून त्यांचा जन्मदिन घोटी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करीत साजरा केला. यावेळी घोटी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश गोरे यांनी त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिवशाही संघटना अध्यक्ष ॲड.रोहित उगले, डॉ. स्वराज्य संघटनेचे महेंद्र शिरसाठ, स्वराज्य संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे, संदीप कांतीलाल शिंदे, युवा नेते सुरेश बोराडे, चेतन तोकडे, राहुल भगत, सामाजिक कार्यकर्ते सागर गावंडे, ॲड. विशाल जगताप आदी उपस्थित होते. वाढदिवसाचा खर्च टाळून यापुढेही शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करणार असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.