स्वार्थासाठी अनुष्ठान नको ; व्यापक श्रद्धेने अनुष्ठान करा – महंत श्री १०८ परमेश्वर गिरी महाराज – कुऱ्हेगाव येथे जय बाबाजी भक्त परिवाराचा प्रदोष सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २० – प्रत्येकाला बाबाजींच्या अनुष्ठानाची किंमत कळायला हवी. जागा चुकली तर वाईट होण्यास वेळ लागत नाही. ज्या ठिकाणी आहे त्याठिकाणी धरून राहा. जे लोक खूप मोठा त्रास सहन करून सद्गुरुंच्या  आणि बाबाजींच्या सानिध्यात जातात त्या पडद्याच्या पलीकडे अमृत आहे. नुसते स्वार्थासाठी अनुष्ठान करू नका, धन संपदा मिळवण्यासाठी अनेक जण अनुष्ठान करतात. यात स्वार्थ लोभ ठेऊ नका, व्यापक भावनेतुन श्रद्धेने अनुष्ठान करा. यश नक्कीच मिळेल. चिंता करू नका चिंतन करा असे मार्गदर्शन महंत श्री १०८ परमेश्वर गिरी महाराज यांनी केले. श्री क्षेत्र कुऱ्हेगाव येथे निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज व उत्तराधिकारी श्री श्री १००८  महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व शुभप्रेरणेने प्रदोष सोहळा संपन्न झाला. ह्या सत्संग कार्यक्रमात परमेश्वर गिरी महाराज बोलत होते. प्रदोष सोहळ्याच्या निमित्ताने हिंदू धर्मातील थोर साधु संत येत्या गुढीपाडव्याला होणाऱ्या हिंदू हुंकार सभेचे आमत्रंण घेऊन आले होते. यावेळी गावाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिवभक्त ह्रदयानंद माऊली, देवानंद महाराज, नागेशरानंद महाराज, विवेक वडनेरे, सुभाष पोरजे, रविंद्र मेदने, स्वप्नील भिमस्कर, रामदास गडगर, रवी भोई, कुऱ्हेगावातील ग्रामस्थ, तालुक्यातील सर्व जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

error: Content is protected !!