इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ : इगतपुरी रेल्वे पोलीस स्टेशन हददीत चालु रेल्वे गाडयांमध्ये मोबाईल व बॅग चोरीचे गुन्हे घडले होते. त्यास अनुसरुन लोहमार्ग औरंगाबादच्या पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, गणेश शिंदे यांनी इगतपुरी लोहमार्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन बनकर, लोहमार्ग औरंगाबाद सायबर सेलच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप यांना सुचना व मागर्दशन करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचित केले होते. त्यानुसार चोरीस गेलेल्या मोबाईल पैकी ४ मोबाईल सायबर सेलकडुन ट्रेसिंग करुन इगतपुरी रेल्वे पोलीस स्टेशनचे पथकामार्फत कौशल्यपुर्ण तपास करुन संशयित आरोपीतांकडुन मुंबई, नाशिक, मालेगाव येथुन आरोपीसह ताब्यात घेण्यात आले. तपास पथकाने इतर ३ आरोपींना विविध गुन्ह्यात अटक करुन त्यांच्याकडुन ४ मोबाईल, १ लॅपटॉप आणि ५ बॅगा जप्त करण्यात आल्या. पथकाने इगतपुरी रेल्वे पोलीस स्टेशनकडील ९ गुन्हे उघडकीस आणुन एकुण १ लाख ४० हजार १८९ रुपयांचा मुद्धेमाल हस्तगत करण्यात आला. पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक काजवे यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी लोहमार्ग पोलीस स्टेशनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सचिन बनकर, लोहमार्ग औरंगाबाद सायबर सेलचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप, पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार व सायबर सेलकडील वैभव पाटील, दिनेश चामनार यांनी केली आहे.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group