वाडीवऱ्हे येथे लघु उद्योजक महिलांना आर्थिक बीज भांडवल वाटप

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – CYDA, युथ एड फाउंडेशन यांच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रात उपजीविका, शिक्षण, आरोग्य व युवा विकास या घटकांवर काम केले जात असते. त्यानुषंगाने गत वर्षापासून महिंद्रा ॲक्सेलो कंपनीच्या अर्थसाहाय्याने सीवायडए संस्था व युथ एड फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी तालुक्यातील ६ गावामध्ये लघु उद्योजक ७० महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये महिलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन, व्यवसाय मार्केटिंग, आर्थिक नियोजन व व्यवसाय नियोजन आदी घटकांवर मार्गदर्शन करण्यात आले. आतापर्यंत ४४ व्यवसाय नवीन सुरु झाले. त्यापैकी ३५ महिला लघु उद्योजकांना वाडीवऱ्हे येथे महिंद्रा ॲक्सेलो कंपनीच्या मदतीने इगतपुरी तालुक्यातील उद्योजकांना ३ लाख आर्थिक बीज भांडवल वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी वाडीवऱ्हेचे सरपंच रोहिदास कातोरे, ॲक्सेलो कंपनीचे प्लांट व्यवस्थापक सुनील तिडके, उपव्यवस्थापक संतोष दुसाने, युथ एड फाउंडेशनच्या संचालिका ज्योत्स्ना बहरीट, प्रकल्प व्यवस्थापक नाशिक विभाग cyda योगेश पी..पाटील, ग्रामविकास अधिकारी किशोर दळवे यांच्या उपस्थितीत वाडीवऱ्हे येथे लघु उद्योजक महिलांना आर्थिक बीज भांडवल वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये झेरॉक्स शॉप, पीठ गिरणी, दुग्ध व्यवसाय, ब्युटीपार्लर, किराणा दुकान, साडी विक्री व टेलरिंग व्यवसाय या व्यवसायांचा समावेश आहे. सूत्रसंचालन मयुरी कातोरे यांनी तर कार्यक्रम अधिकारी भाऊसाहेब शेळके यांनी आभार मानले. अविनाश सोनवणे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रभाकर बेंडकोळी, बंडू कातोरे, रोहित भोर व बचत गटातील महिलांचे कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले.

Similar Posts

error: Content is protected !!