इगतपुरीनामा न्यूज, दि. १६ – घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली खैरगांव व बोरीचीवाडी भागात आज गावठी हातभट्ट्या तोडून गुन्हे दाखल केले. येथील जंगलात दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर घोटी पोलिसांनी शोध घेऊन गावठी दारू बनविण्यासाठी सडवलेले रसायन आणि दीड लाख किमतीची दारू पोलिसांनी नष्ट केली. अतिशय सूक्ष्म नियोजन करून घोटी पोलिसांनी दारू नष्ट करण्याची कारवाई केली आहे. स्थानिक पोलीस कारवाई करीत असले तरी दारूबंदी खात्यानेही कारवाई करणे गरजेचे आहे अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. यापुढेही ही मोहीम अशीच सुरू राहणार असून कुठे दारू तयार अथवा विकली जात असेल तर तात्काळ घोटी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी केले आहे. घोटी पोलीस ठाण्याचे संदीप मथुरे, धर्मराज पारधी, गोसावी, होमगार्ड आदी पथकाने ही कामगिरी केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group