महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे नामफलक उदघाटन व छत्री वाटप कार्यक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शहापूर व ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यामाने शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते मुंबई नाशिक महामार्गावर नामफलक उदघाटन व जिल्हा परिषद शाळा आसनगाव येथे विद्यार्थ्यांना छत्र्या वाटप कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नेहमीच समाजासाठी आपली बांधिलकी जपत वर्षभर पत्रकार व समाजातील इतर घटकांसाठी नेहमीच कार्यक्रम राबवत असतो. शुक्रवारी जिल्हा परिषद शाळा आसनगाव येथे विद्यार्थ्यांना व पत्रकारांना छत्र्या वाटप करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या नामफलकाचे उदघाटन आसनगाव व इगतपुरी येथे घाटनदेवी येथे करण्यात आले.

नामफलकाच्या उदघाटन प्रसंगी आमदार दौलत दरोडा व माजी आमदार पांडुरंग बरोरा उपस्थित होते. प्रमुख पाहुणे महाराष्ट्ट राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे, ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे, राष्ट्रवादी ठाणे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, जिल्हा कृषी सभापती संजय निमसे, इगतपुरी तहसीलदार परमेश्वर कासुळे, उद्योजक अनिल मानीवडे, श्यामबाबा परदेशी, पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे, नागेश घुमरे, भास्कर जाधव, महेश धानके, योगेश हजारे, प्रहारचे तालुकाध्यक्ष वसंतकुमार पानसरे, सचिव नरेश पाटील, शहापूर तालुकाध्यक्ष सुनिल घरत, भिवंडी तालुकाध्यक्ष मेघनाथ विशे,
इगतपुरी तालुकाध्यक्ष पोपटराव गवांदे, भाजप शहापूर तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वेखंडे, आधार प्रतिष्ठानचे नागेश घुमरे आदींसह कार्यक्रमास पत्रकार संघाचे शहापूर, भिवंडी, कल्याण, ठाणे व इगतपुरी येथील पदाधिकारी उपस्थित होते.

खान्देशातुन कसारा घाटमार्गे मुंबईला येणाऱ्या, जाणाऱ्या पर्यटक, पत्रकार, प्रवाशी यांच्या स्वागताचे नामफलक लावण्याची पत्रकार संघाची संकल्पना आज साकार होत आहे. असे यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विविध उपक्रम प्रेरणादायी असून जिल्ह्यातील पत्रकारांनी याचे अनुकरण करायला हवे असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे यांनी आसनगाव येथे छत्री वाटपाच्या कार्यक्रमात केले.

ठाणे जिल्हात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने २ हजार छत्र्या वाटपाचा संकल्प सोडला असल्याची  माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान चंदे यांनी आसनगाव जिल्हा परिषद शाळा क्रं १ व २ येथील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप  करताना दिली. सदर छत्रीचे वाटप शेंद्रूण प्राथमिक आरोग्यकेंद्र शहापूर, कसारा ट्रॅफिक पोलीस, भाजी विक्री करून  पोट भरणाऱ्या आदिवासी महिला, शालेय विद्यार्थी आदी ठिकाणी छत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम पार पडण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शहापूर तालुकाध्यक्ष सुनील घरत, सुभाष विशे,.संजय भालेराव, प्रकाश अंदाडे, प्रकाश जाधव, संतोष चोणकर यांनी विशेष मेहनत घेतली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!