इगतपुरी तालुक्यात आज ३९ व्यक्तींची कोरोनावर मात ; मोडाळे गाव कोरोनामुक्त करण्याचा ग्रामस्थांचा संकल्प

इगतपुरीनामा न्यूज, दि. १
इगतपुरी तालुक्यात आज ३९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ४५ नव्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीं सापडल्या आहेत. आज अखेर एकंदरीत ३४६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली. गावोगावी लसीकरण कार्यक्रमाला आजपासून वेग येणार असून इगतपुरी तालुक्यात निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा सक्रीयतेने काम करीत आहे.
दरम्यान, मोडाळे येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. युवकांनी जनजागरण करून कोरोनामुक्त मोडाळे करण्यासाठी गावात १०० टक्के लसीकरण करण्याचा संकल्प केला. जेष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन लसीकरण करून घेतले. लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ  शिरसाठे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी केला. यावेळी वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते. 

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमासाठी इगतपुरी तालुक्यातील सगळ्या गावातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. जनजागृती करून आपापल्या गावात 100 टक्के लसीकरण करावे. आगामी काळात प्रत्येक गाव कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वजण संकल्प करूया.
अनिता गोरख बोडके, जिल्हा परिषद सदस्या नाशिक