रविवार विशेष : उन्हाळ्यात घेऊ या काळजी

मागील तीन दिवसांपासून कमाल तापमान वाढत असून सध्या पारा थेट ३८-४० अंशापर्यंत सरकल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत उन्हाचा तीव्र तडाखा जाणवू लागत आहे. त्यामुळे प्रत्येकांनी उन्हात बाहेर न पडता घरात किंवा ज्याठिकाणी सावली आहे अश्या ठिकाणी विश्रांती करणे आवश्यक आहे. अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घरात थांबलेलेच बरे राहील. कारण अश्या तीव्र उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हात बाहेर निघताना छत्री, पांढरा रुमाल सोबत असणे आवश्यक आहे. लहान मुलांना शक्यतो बाहेर घेऊन जाणे टाळावे. शाळेत जाणारी मुले 12 च्या आत घरात येतील असे वेळापत्रक तयार करावे. शालेय मुलांनी स्वतः आजारी पडणार नाही याची काळजी जरूर घ्यावी. बाहेर पडताना सोबत थोडे पाणी नेहमी असू द्यावे कारण या वातावरणात आपल्या शरीरातील पाणी कमी त्यामुळे डीहायड्रेशन होण्याची शक्यता असते. त्याचसोबत जास्तीत जास्त पाणी पीत राहावे. या काळात शक्यतो फ्रीजमधील पाणी पिणे टाळावे. त्यापेक्षा नैसर्गिक थंड पाणी करून पाणी पीत राहावे. दुपारच्या वेळी विश्रांती घ्यावे. उन्हाचा त्रास सहन करण्यापेक्षा त्याची काळजी घेतलेली केव्हाही बरे. म्हणून आपण ही काळजी घ्या आणि इतरांना काळजी घ्यायला सांगू या.

  • नागोराव सा. येवतीकर
    विषय शिक्षक, धर्माबाद, 9423625769

कविता – आलाय उन्हाळा

ऋतूमध्ये बदल झाला की
हवामानात देखील बदल होते
हिवाळ्याचा गारवा संपला की
हवेतील उष्णता जाणवू लागते

उन्हाचा चढत चाललाय पारा
उन्हाळ्याची लागली चाहूल
बाहेरच्या उष्णतेला पाहून
घराबाहेर पडत नाही पाऊल

आला उन्हाळा आरोग्य सांभाळा
बाहेर जातांना रुमाल बांधा डोक्याला
भरपूर पाणी प्या आराम करा
उन्हात न फिरता उष्माघात टाळा

सकाळ सायंकाळ कामे करा
दुपारच्या वेळी थोडं आराम करा
शरीराला येऊ देऊ नये थकवा
आरोग्याची काळजी घ्या जरा

  • नासा येवतीकर, धर्माबाद
    9423625769

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!