गोंदे दुमाला गावचे भूमिपुत्र, आदर्श शिक्षक, शिक्षक संघ नेते आणि आपल्या सर्वांचे मित्र श्री. हरिश्चंद्र रघुनाथ जाधव यांचा द्वितीय चिरंजीव निशांत हरिश्चंद्र जाधव याची मागील वर्षी DRDO मध्येशास्त्रज्ञ म्हणून निवड झाली होती. परंतु कोरोना काळामुळे लांबणीवर पडलेली मेडिकल फिटनेस टेस्ट आणि इतर काही टेक्निकल बाबींमुळे प्रत्यक्ष ऑर्डर मिळण्यास वर्ष लागले. परंतु म्हणतात ना भगवान के घर में देर है लेकीन अंधेर नही. आणि आज तो सोनियाचा दिवस उगवला..
मराठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला निशांतच्या आणि कुटुंबियांच्या हातात त्याच्या नियुक्तीची ऑर्डर मिळाली. ख-या अर्थाने पाडव्याचा गोडवा ऑर्डरच्या रूपात मिळाला. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला जि प शिक्षकाचा मुलगा जिद्दीची पराकाष्टा करून शास्त्रज्ञ म्हणून देशसेवा करणार आहे. इंजिनिअरिंग करताना निशांतने तयार केलेल्या स्पोर्ट कारने अमेरिकेतील स्पर्धेत भाग घेऊन देशाचे प्रतिनिधित्व केले होते .
निशांतने यापूर्वीच महाराष्ट्र शासनाच्या MPSC परीक्षेद्वारे A.I.M.V.ही पोस्ट मिळवली होती. परंतु शास्रज्ञ होण्याचे आपले ध्येय निश्चित केल्याने अभ्यासासाठी दिल्लीला जाऊन अगदी दृढनिश्चयाने व कठोर मेहनतीने ते साध्य केले हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
निशांतसाठी, त्याने शिकून मोठे व्हावे असे स्वप्न पाहिलेल्या आईवडिलांसाठी आणि पाठीशी उभ्या असणाऱ्या भावासाठी हा आनंदाचा हा क्षण होता. कुटुंबियच नाही तर सर्व शिक्षक, मित्रपरिवार ,गोंदे दुमाला गाव, आणि नातेवाईक ह्या सर्वांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. निशांतची बेंगलोरला पोस्टिंग झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा मुलगा व खेडेगावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेला मुलगा आज अभ्यास, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर DRDO मध्ये शास्त्रज्ञ बनला. त्याला मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे, आई-वडिलांचे आणि समस्त जाधव परिवाराचे हार्दिक हार्दिक अभिनंदन..!
निशांतच्या हातून देशसेवा घडो.. आणि भविष्यात आणखी मोठ्या पदाला गवसणी घालून आई-वडिलांचे, गावाचे आणि देशाचे नाव उज्वल करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. निशांतला त्याच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा….
निवृत्ती यशवंत नाठे
इगतपुरी तालुका शिक्षक संघ