
इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ – जिल्हा परिषद नाशिक आयोजित अध्यक्ष चषक कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये इगतपुरी तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख आदींनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. ५० मिटर धावणे स्पर्धेत फणसवाडी शाळेचा विद्यार्थी रोहित वाळू मेंगाळ आणि पेहरेवाडी शाळेची विद्यार्थिनी प्रमिला खंडू खडके यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. १०० मिटर धावणे स्पर्धेत रामराव नगर शाळेतील नियती भगीरथ इलग हिने द्वितीय क्रमांक मिळवला. वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत कोरपगाव शाळेची राधा रवींद्र दोंदे हिने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तेजनार्थ बक्षीस पिंप्री सदो शाळेतील फैज अमजद पटेल याने मिळवले. विशेषतज्ञ उत्तम आंधळे, स्मिता खोब्रागडे, बाळासाहेब मुर्तडक, मनोज झांजरे, विशेष शिक्षक बाप्पा गतीर, संदीप शिरसाठ, संजय पाटील, निलाक्षी शेलार, नीलम पवार आदींनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
