लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 9
कलियुगात काळ पाठीमागे लागला आहे. मरणाची तयारी कुणीही करीत नाही. मृत्यू लोकांत दोन दिवस आहे. परमेश्वराला शरण जावे ही श्रीमद भागवत कथा आहे.
हिऱ्याची व काचेची बरोबरी होत नाही. त्याचप्रमाणे पाप पुण्याची बरोबरी होत नाही. श्रीमद भागवत कथा अमृत असून अनंत आहे. भगवंताचे नामसमरण केल्याने पापाचा नाश होऊन उद्धार होतो असे निरूपण भागवताचार्य गोकुळ महाराज पुंडे यांनी केले. घोटी येथे श्रीमद भागवत कथा व श्रीराम कथामृत सत्संग सोहळ्याचा आजपासून प्रारंभ झाला. गीता भागवतावर आधारित असलेल्या कथेप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्रत्येक ठिकाणी माणूस दुःखी आहे. मनुष्याला निंदेचे व द्वेषाचे दुःख आहे. सत्याच्या मार्गावर अपमान लबाड्या करणारे श्रीमंत आहे. त्यांचा उदो उदो केला जातो हे कलियुगात चालले आहे. आधी गुरुचे दर्शन नंतर देवाचे दर्शन घेतल्याने साधकाचा उद्धार होतो, असेही गोकुळ महाराज पुंडे यांनी सांगितले. सत्य कुणी बोलत नाही सर्व खोटे बोलतात कलियुग सत्याचे नाही परमेश्वराचे चिंतन, नामस्मरण करावे असेही त्यांनी सांगितले. सात दिवस होणाऱ्या ता कार्यक्रमात रामायणाचार्य हभप तुषार महाराज खातळे, भागवताचार्य गोकुळ महाराज पुंडे यांच्या सुमधुर वाणीतून कथेचे मौल्यवान मार्गदर्शन मिळणार आहे. सकाळपासूनच सामुदायिक नामजप, नागफेरी, सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत श्रीराम कथा असे धार्मिक कार्यक्रमाची रूपरेषा होती. यावेळी माऊली महाराज पौळकर, संदीप शिंदे, गंगा महाराज, शुभम भगत, विनोद लायरे, गायक अरुण शिंदे आदी उपस्थित होते.