
इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ – आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील विविध शाळांमधील खेळाडूंसाठी नाशिकमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ह्यामध्ये अतिशय अटीतटीचा सामना झालेल्या मुंडेगाव येथील इंग्रजी माध्यम आदिवासी निवासी आश्रमशाळेच्या १७ वर्षा खालील हँडबॉल संघाने चॅम्पियन ट्रॉफी जिंकून प्रथम क्रमांक पटकावला. मुख्याध्यापक तन्वीर जहागीरदार, अधिक्षक संतोष सोनवणे, क्रीडा शिक्षक मंगेश गमे यांनी विजेत्या संघाला मार्गदर्शन केले. संघाच्या यशाबद्धल त्यांचे अभिनंदन सुरु आहे. विजेत्या हँडबॉल संघात सुधीर कनोज, भुषण पवार, दिगंबर बागुल, मयूर पवार, विशाल पवार, रामप्रसाद पागी, हरिदास दळवी, समीर भरसट, रोशन चौरे, रोशन चव्हाण, रोशन बेंडकोळी, अंकुश भुरबुडे, रोहिदास भुरबुडे, मनोहर मोहंडकर या खेळाडूंचा समावेश आहे.