पिंप्री सद्रोद्दिन येथे ग्रामस्तरावरील अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंप्री सद्रोद्दिन ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मराठी व उर्दू माध्यम येथे अमृत महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच मंजुळा कावजी ठाकरे, उपसरपंच शहनाज बद्रुद्दीन शेख यांच्या हस्ते तर मराठी शाळेचे ध्वजारोहण ज्येष्ठ नागरिक बंडू उबाळे, रमेश पाटेकर, प्रकाश उबाळे तर उर्दू शाळेचे ध्वजारोहण बद्रुद्दीन शेख, शफी पटेल यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायत पिंप्री सद्रोद्दिन व शाळा व्यवस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्तरावर सेवा देणारे शासकीय कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार समारंभ पार पाडला.

मान्यवरांच्या हस्ते शोभा मोतीलाल ढोले मुख्याध्यापिका मराठी माध्यम, मुख्याध्यापिका उर्दु माध्यम रुबीना अनिस शेख, पदवीधर शिक्षक निवृत्ती यशवंत नाठे, पदवीधर सुखदेव बाबूलाल ठाकरे, शिक्षिका योगिता मुरलीधर हाके, शिक्षिका चेतना रतन गावित, शिक्षक विलास ढवळू उबाळे , शिक्षक विनोद पाटील, ऊर्दू शाळेचे शिक्षक अब्रार सर व  ग्रामसेवक गुलाब साळवे यांना सन्मानित करण्यात आले. अंगणवाडी सेविका संजीवनी वाघमारे, वनिता सोनवणे, अंगणवाडी मदतनीस कमलाबाई जगदाळे, ज्योती मीतीन उबाळे यांनाही गौरवण्यात आले

याप्रसंगी सरपंच मंजुळा ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, उपसरपंच शहनाज बद्रुद्दिन शेख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमजद बाबामिया पटेल, पोलीस पाटील रमेश पाटेकर, पिके ग्रुपचे संचालक जगण रामु  कदम, माजी उपसरपंच प्रकाश उबाळे, सामाजिक कार्यकर्ता फ़िरोज बरुद्दीन शेख, ग्रामपंचायत सदस्य जयश्री बबलू उबाळे, संतोष यशवंत पाटेकर, दिपाली लहानु जाधव, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर नारायण कदम, ग्रामपंचायत सदस्य भास्कर तुकाराम सोनवणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष बबलू दामू उबाले, मतीन हैदर पठाण, आयाज पठान, सुषमा प्रवीण उबाळे आदी उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!