“छत्रपतींचा पठ्या” डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे यांची “स्वराज्य”च्या जिल्हाप्रमुख पदावर निवड : नाशिक जिल्ह्यात भगवा फडकवण्यासाठी जीवाचे रान करील – डॉ. रुपेश नाठे

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ – “छत्रपतींचा पठ्या” म्हणून सुप्रसिद्ध असणारे डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे यांची स्वराज्य संघटना जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाली आहे. नाशिक दौऱ्यात कार्यकर्ता मेळावा घेऊन छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज्याचे शिलेदार निवडले. राज्यभर स्वराज्य संघटनेचा विस्तार करतांना केंद्रस्थानी सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यात पदाधिकारी नियुक्त्या देण्यात आल्या. छत्रपती संभाजी राजे यांचे निकटवर्तीय आणि ग्रामीण भागात अतिशय उत्तम जनसंपर्क असणारे डॉ. रुपेश हरिश्चंद्र नाठे यांच्या जिल्हाप्रमुखपदी निवडीचे जिल्हाभर स्वागत करण्यात आले. स्वराज्य हे प्रस्थापितांचे नसून विस्थापितांचे आहे. त्यातूनच नवे अभ्यासू नेतृत्व घडणार असल्याची ग्वाही छत्रपती संभाजी राजांनी नियुक्तीपत्र देतांना दिली. महाराष्ट्राच्या प्रगतीला हातभार लागून या मातीत नवीन नेतृत्व घडावे यासाठी स्वराज्य कटीबद्ध राहील. स्वराज्य हे अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांचे असून प्रत्येक विस्थापित व अन्याय झालेल्या घटकांना न्याय देण्यासाठी संघटना लढेल. यासाठी आपण सर्वजण वचनबद्ध आहोत असेही यावेळी छत्रपती संभाजी राजे म्हणाले.

छत्रपती संभाजी राजे यांनी भाषणामध्ये डॉ. रुपेश नाठे यांचा "माझा पठ्या" उल्लेख केला. म्हणून त्यांना "छत्रपतींचा पठ्या" म्हणून ऊर्जात्मक ओळख मिळाली. डॉ. रुपेश नाठे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा मी बालपणापासून भक्त असल्याचे मधुर फळ मला आज मिळाले. छत्रपतींचे वंशज यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून मला आशीर्वाद दिले. मी नक्कीच स्वराज्यच्या माध्यमातून गोरगरीब, कष्टकऱ्यांची सेवा करून त्यांना न्याय मिळवून देईल. नाशिक जिल्ह्यात भगवा फडकवण्यासाठी जीवाचे रान करील असे त्यांनी शेवटी सांगितले.

डॉ. रुपेश नाठे यांनी शालेय जीवनात हिंदवी स्वराज्य ग्रुपच्या माध्यमातून अनाथाश्रम, वृद्धाश्रमात जाऊन मदत केली. वाढदिवसाचा निम्मा खर्च हा सामाजिक कामे करण्यासाठी खर्च करावा असा त्यांचा सर्वांना आग्रह असतो. शिवविचारांच्या मार्गाने काम उभे केल्यानंतर ग्रामीण भागात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत ते सर्वांच्या परिचयात आले. विद्यार्थ्यांचे प्रश्न वेगवेगळ्या माध्यमातून सोडवत कोविड काळात वैद्यकीय विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी शासन दरबारी मांडले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांची भेट घेतली. छत्रपती संभाजी राजे यांच्या माध्यमातून ५० हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न त्यांनी सोडवला. यामुळे डॉ. रुपेश नाठे विद्यार्थीप्रिय आणि लोकप्रिय झाले. छत्रपती संभाजी छत्रपतींनी यासाठी त्यांच्या पाठीवर हात ठेवून शाबासकी दिली. पाठीवर सक्षम हात असल्याने नवे नेतृत्व उभे राहू शकले. जोमाने काम उभे झाल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी त्यांना नियमित मार्गदर्शन केले. स्वराज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या संपर्कात आल्यानंतर नाशिकमध्ये त्यांचा अफाट जनसंपर्क निर्माण झाला. त्यांच्या निवडीमुळे स्वराज्य संघटनेमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

Similar Posts

error: Content is protected !!