
इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१ – इगतपुरी येथील अप्रभाव मानस प्रोजेक्ट हॉटेलमध्ये एका व्यक्तीने आज आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आनंद गणपतराव शिंदे वय. 42 वर्षे धंदा. मॅनेजर रा. खालची पेठ इगतपुरी यांनी इगतपुरी पोलिसांना याबाबत माहिती दिली. इगतपुरी पोलिसांनी अकस्मात मृत्यू दाखल करून तपास सुरु केला आहे. चिराग विनोद राय वरैया वय अंदाजे 45 वर्षे रा. मुलुंड, मुंबई असे मयत व्यक्तीचे नाव आहे. अप्रभाव मानस प्रोजेक्ट हॉटेल विवांत गट नं. 284 ब मधील रुम नं. F003, तळेगाव, इगतपुरी येथे अज्ञात कारणावरुन चिराग वरैया याने पुजेच्या कापडाच्या सोवळ्याने गळ्यास व फँनला बाधुन गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. वरिष्ठांच्या आदेशान्वये पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जाधव, एस. एस. लोहरे आदी करीत आहेत.