मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी इगतपुरी शहरात शिबीर सुरु

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी शहरातील सर्व महिलांसाठी महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फार्म भरण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आज इगतपुरी नगर परिषद कार्यालयात पहिल्याच दिवशी शेकडो फार्म जमा करण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी पंकज गोसावी, कार्यालय अधीक्षक रमेश राठोड, कर्मचारी रश्मी ननावरे,असमा पठाण, अमृता बाविस्कर, भारतीय जनता पार्टीचे किरण फलटणकर, वैशाली आडके, योगेश चांदवडकर, रोहन दगडे, गजानन गोफणे, अभिजित जाधव, सुधीर कांबळे आदी उपस्थित होते. आजपासून शनिवार दि. १३ जुलै २०२४ पर्यंत  सकाळी ११ ते ५ या वेळेत नगर परिषद कार्यालय येथे फार्म भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. इगतपुरी शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रात सकाळी ११ ते १ या वेळेत फार्म भरण्यात येतील. सर्व माता बहिणींनी ह्या ह्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा नेते किरण फलटणकर यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!