पुण्यश्लोक सदगुरू शिवपार्वती प्रतिष्ठानचे २०२३ साठी विविध पुरस्कार जाहीर

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३० – नाशिक येथील पुण्यश्लोक सदगुरू शिवपार्वती प्रतिष्ठान यांच्यावतीने पुण्यश्लोक मातोश्री पार्वतीबाई गोसावी यांच्या ४५ व्या वार्षिक स्मृतिदिन समारोह निमित्ताने दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले आहे. पुण्यश्लोक सदगुरू शिवपार्वती अध्यात्मिक पुरस्कार भालोद भरूच येथील प. पू. शरदचंद्र प्रतापे महाराज, श्रीराम पराडकर वैदिक पुरस्कार प. पू. रंगाकाका कुलकर्णी महाराज, पुणे, नंदलाल जोशी वेदवेदांग पुरस्कार वे. मू. कौस्तुभशास्त्री पाटणकर, त्र्यंबकेश्वर नाशिक, सर डॉ. मो. स. तथा आप्पासाहेब गोसावी लोकसेवक पुरस्कार नाशिक येथील डॉ. भास्कर बळीराम पवार, डॉ. सुनंदा गोसावी संगीतरत्न पुरस्कार मंजिरी असनारे – केळकर नाशिक, सर्जनशीलता पुरस्कार  नाशिक येथील कु. श्रेया किरण गवांदे, आदर्श संस्था पुरस्कार आशीर्वाद सेवा धाम संचलित श्रीमती गार्डाबाई बालसदन नाशिक यांना घोषित झाले आहेत. यंदाचा ४५ वा वार्षिक स्मृती समारोह ६ ते ९ फेब्रुवारी पर्यंत रोज सायंकाळी ६:३० ते ८:३० पर्यंत कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास, गंगापूररोड, नाशिक येथे तर याच ठिकाणी  पुरस्कार वितरण समारंभ ९ फेब्रुवारीला सायंकाळी स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, फुलगाव, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे अशी माहिती संस्थेचे सचिव कल्पेश गोसावी यांनी दिली.

याप्रसंगी अनुबंधी सोहळ्याचे आयोजन केले असून १) मंगला व मोहिनीराज एकनाथ कुलकर्णी, कुशल प्रशासक नाशिक २) स्मिता व मिलिंद काटेकर विख्यात साहित्यिक व उद्योजक, पुणे  ३) डॉ. अंजली व सतीश कुलकर्णी शिक्षणतज्ञ, नाशिक ४) धनश्री व भूषण मटकरी प्रसिद्ध मुलाखतकार व RJ नाशिक ५) रेवतीबाई व जयंतराव कुलकर्णी समाज सेवाव्रती, नाशिक यांचा अनुबंधी सोहळ्यात सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी लेखक डॉ. उल्हास रत्नपारखी ह्यांच्या ज्ञानेश्वरीतील मंगलाचरणे  [शिवज्योती विशेषांक] ह्या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात प्रज्ञावंत विशेष पुरस्कारने अक्षय शशिकांत शहापूरकर [बहुआयामी, सृजनशील कलाकार] पुणे यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ६ ते ९ फेबुवारी पर्यंत दररोज सायंकाळी ६: ३० ते ८ .३० या दरम्यान “एकनाथी भागवताचे आधुनिक जीवनास योगदान” या विषयावरील चार पुष्प स्वामिनी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, फुलगाव, पुणे या गुंफणार आहेत. या सुश्राव्य व्याख्यानमालेचा सर्वांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्रधान विश्वस्त सर डॉ. मो. स. गोसावी, अध्यक्ष सुप्रिया गोविंद पानसे, समन्वयक प्रा. लक्ष्मीकांत जोशी, सचिव कल्पेश गोसावी यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!