आग्रा ते राजगड गरुडझेप मोहिमेतील २०० मावळ्यांचे नासिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने स्वागत

इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

नासिक शहरात दाखल झालेल्या आग्रा ते राजगड गरुडझेप मोहिमेचे विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. आग्रा ते राजगड असे जवळपास १ हजार २५० किमी अंतर पार करत १०० सायकलस्वार आणि ४ घोडेस्वार सोबत घेऊन एक अनोखा विक्रम ह्या मोहिमेच्या माध्यमातून नोंदवण्यात येणार आहे. औरंगजेबाने छत्रपती शिवराय ह्यांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले होते. गनिमी काव्याने महाराज तेथून निसटले या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळेच तो प्रसंग डोळ्यासमोर ठेवून १७ ऑगस्टला स्वराज्यरूपी २०२२ स्वातंत्र्याची शिवज्योत आग्रा येथून घेऊन राजगडाच्या दिशेने जवळपास २०० मावळे दाखल होत आहे.

मारुती गोळे यांच्या नेतृत्वाखाली ही गरूडझेप मोहीम पार पडत आहे. नासिक येथे नासिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माने, आयर्नमॅन किशोर काळे, देवळा सायकलिस्ट अध्यक्ष अरुण पवार, सदस्य संजय पवार,मनीषा पवार, प्रवीण पवार, खुशी पवार, रावसाहेब शिंदे व इतर पदाधिकारी यांनी या मोहिमेचे स्वागत केले. राजगडाकडे जाणाऱ्या मावळ्यांचे ह्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!