इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – धुळे येथे आंतर शालेय तायक्वांदो विभागीय स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये इगतपुरी येराहील पंचवटी इंग्लिश मिडीयम स्कूल टाके घोटी, आदर्श कन्या विद्यालय घोटी, महात्मा गांधी व ज्युनिअर कॉलेज इगतपुरी, हॉली फॅमिली कॉन्व्हेन्ट हायस्कूल इगतपुरी येथील विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. त्यामध्ये महात्मा गांधी व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. त्यामध्ये गौरी बोंडे – सुवर्ण पदक, गायत्री बोंडे – सुवर्ण पदक, करण आडोळे – कांस्य पदक, रोहित आडोळे – कांस्य पदक, सुबोध जगताप – रजत पदक, जयराज चव्हाण – रजत पदक असे पदक पटकावले आहेत. गौरी बोंडे – सुवर्ण पदक, गायत्री बोंडे – सुवर्ण पदक यांची राज्य पातळीवर निवड झाली आहे. सर्व विजेते आयडीयल तायक्वांदो अकॅडमी इगतपुरी येथे तायक्वांदोचे प्रशिक्षण घेत आहेत. तायक्वांदो मुख्य प्रशिक्षक विशाल जगताप, खंडू लहाने, सह प्रशिक्षक मिना जगताप, विकास लहाने, माधव तोकडे यांनी कामगिरी बजावली. पंच म्हणून आयडीयल तायक्वांदो अकॅडमी इगतपुरीचे संध्या भटाटे, इम्रान शेख, सोहन इंगळे यांनी महत्वाची कामगिरी केली.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group